|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापुराचा धोका नसल्याचा निर्वाळा

महापुराचा धोका नसल्याचा निर्वाळा 

प्रतिनिधी/ चिकोडी

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच सीमावर्ती कर्नाटकात गेल्या 36 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले आहे. असे असले तरी तालुक्यातील 8 पैकी 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हिप्परगी धरणातून एकूण 1 लाख 32 हजार क्युसेक पाणी येत आहे. 22 गेटद्वारे 1 लाख 34 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनातर्फे महाराष्ट्रातील जलसंपदा खात्याशी वरचेवर संपर्क ठेवला असल्याने महापूराचा धोका नसल्याची स्पष्टोक्ती चिकोडी तालुका प्रशासनाने तरुण भारतशी बोलताना दिली.

चिकोडी तालुक्यातील 9 पर्जन्यमापन केंद्रापैकी सौंदलगा वगळता इतर 8 ही केंद्रावर पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी चिकोडी येथे 11.8 मि. मी, अंकली येथे 9.4 मि. मी., नागरमुन्नोळी येथे 5.6 मि. मी., सदलगा येथे 9.4 मि. मी, गळतगा येथे 18.4 मि. मी., जोडट्टी येथे 3.4 मि. मी., निपाणी पीडब्ल्यूडी येथे 194, निपाणी एआरएस येथे 206 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. केवळ सौंदलगा येथे आज 72.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून गुरुवारी हे प्रमाण 64.3 मि. मी. इतके होते.

महाराष्ट्रातील महाबळेश्वर वगळता कोयना, वारणा, नवजा, सांगली व कोल्हापूर परिसरात देखील गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख सहा ठिकाणांच्या गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी झालेल्या पावसाच्या प्रमाणाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.