|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » …तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवतील : मुख्यमंत्री

…तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवतील : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे सरसावत असतात. त्यामुळे राज्यात कोणताही भूकंप होणार नाही. तसेच या सरकारला कोणताही धोका नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना सत्तेत राहणार की नाही याबाबत चर्चा सुरु होत्या. यातच राज्यात भूकंप येईल, असे शिवसेनेकडून सांगितले जात होते. यावर ते म्हणाले, जर शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होत असतात. मात्र, शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related posts: