|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » क्रिडा » परविंदर अवानावर हल्ला

परविंदर अवानावर हल्ला 

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा

दिल्लीचा वेगवान गोलंदाज परविंदर अवानावर शुक्रवारी पाच जणांच्या टोळीने हल्ला केला. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा हल्ला कॅसेना साईट-4 जवळील असलेल्या बर्फाच्या फॅक्टरीजवळ करण्यात आला.

हरिद्वार येथून मोटारीने घरी परत असताना अवानावर हा हल्ला हल्लेखोरांनी केला. सदर हल्लेखोर घनगोला खेडय़ातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस चौकशी तपास करीत आहेत. 2012 साली इंग्लंड विरूद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील दोन सामन्यात अवानाने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related posts: