|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » मीनाक्षी-पलक ठरली लावणी सम्राज्ञी जोडी

मीनाक्षी-पलक ठरली लावणी सम्राज्ञी जोडी 

महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नफत्यशैलीला कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वामध्ये नाविन्यपूर्ण ढंगात सादर करण्यात आले. अवघ्या तीनच महिन्यामध्ये या पर्वातील छोटय़ा अप्सरांच्या निरागस अदाकारीने आणि मोठय़ा मुलींच्या दिलखेचक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली. या नव्या पर्वामध्ये 12 प्रतिभावान आणि नफत्याची जाण असणाऱया जोडय़ांमध्ये महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी पद जिंकण्यासाठीची चुरस चांगली रंगली. शेवटच्या आठवडय़ामध्ये या 12 जोडय़ांमधून मीनाक्षी-पलक, धनश्रीöअनुष्का, चिन्मयी-समफद्धी, समफद्धी-धनिष्ठा आणि ऋतुजा -ईश्वरी या पाच जोडय़ांनी महाअंतिम सोहळय़ामध्ये जाण्याचा मान पटकावला. ज्यामध्ये मुंबईची मीनाक्षीöपलक ही जोडी ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाची महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी जोडी. या विजेत्या जोडीला कलर्स मराठीतर्पे सन्मान चिन्ह तसेच 3 लाखांचा धनादेश देण्यात आला. तर बाकीच्या चारही जोडय़ांनी दुसरे स्थान पटकावले. महाअंतिम सोहळय़ासाठी सजलेला मंच, स्पर्धकांमधील चुरस आणि उत्तम कलाविष्कार प्रेक्षकांना तीन तासाच्या महाअंतिम सोहळय़ामध्ये 30 जुलैला संध्या 6.30 वा. कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

सोहळय़ाची सुरुवात पाच जोडय़ांच्या सुंदर समूह नफत्याने झाली. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या वैशाली जाधव आणि मफण्मयी गोंधळेकर या विजेत्यांनी अप्रतिम लावणीने जमलेल्या प्रेक्षकांची तसेच परीक्षकांची वाहवा मिळवली. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या मागील पर्वातील परीक्षक मानसी नाईक आणि दिपाली सय्यद यांनी आपल्या नफत्यातून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि महाअंतिम सोहळय़ाची शोभा देखील वाढवली. ज्येष्ठ नफत्यांगना शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर यांनी सादर केलेल्या नफत्याने महासोहळय़ाची रंगत वाढली. या भागातील विशेष म्हणजे छोटय़ा आणि मोठय़ा मुलींचा लाडका जितु मामा म्हणजेच जितेंद्र जोशीने देखील बम बम बोले, सुबहा होगई मामू या गाण्यांवर छोटय़ा अप्सरांबरोबर नफत्य सादर करून या अप्सरांना भेटच दिली. महाराष्ट्राची लाडकी सोनाली कुलकर्णी हिने तिची सुप्रसिध्द गाणी अप्सरा आली तसेच बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा आणि दिवानी मस्तानी या गाण्यावर अतिशय सुंदर नफत्य सादर केले.

महाअंतिम सोहळय़ामध्ये पाच जोडय़ांनी एकसे बडकर एक लावण्या सादर केल्या. ज्यामधील छोटय़ांची निरागस आणि गोंडस अदाकारी तसेच मोठय़ांची ठसकेबाज लावणी खरोखरच कौतुकास्पद होती. धनश्री आणि अनुष्काने पॅण्टास्टीक म्हणतोय मला या गाण्यावर लावणी सादर केली. चिन्मयी-समफद्धीने फितुरी तर मीनाक्षी-पलक यांनी राती अर्ध्या राती यावर लावणी सादर करून परीक्षकांची मने जिंकली. समफद्धी आणि धनिष्ठाने इश्काचा बाण तसेच ऋतुजा आणि ईश्वरीने तुम्हावर केली या गाण्यावर लावणी सादर केली.

 

Related posts: