|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडले!

बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडले! 

प्रतिनिधी/ चिपळूण

बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडून येथील महसूलने त्यांना सुमारे 7 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी 1.30 वाजता शहरातील बहादूशेखनाका येथे करण्यात आली.

  अशोक जगन्नाथ मोहिते, सुनील अप्पा धोत्रे, संजय रामा वडार, बराप्पा मल्लाप्पा पाटील हे चौघेजण महाड येथून ही वाळू इस्लामपूर येथे नेत होते. यातील तिघांकडे पासच नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्येकी 2 लाख, तर एकाकडे दोन ब्रासचा पास असताना गाडीत चार ब्रास वाळू असल्याने 1 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे चारही ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.

 ही कारवाई प्रांताधिकारी सौ. कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी आयरे, प्रकाश सावंत, तलाठी यु. आर. राजेशिर्के, गोंधळेकर आदीच्या पथकाने केली. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

 

 

Related posts: