|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अजितदादांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमांनी उत्साहात

अजितदादांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमांनी उत्साहात 

प्रतिनिधी / बारामती

22 जुलै हा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस. या रोजी अनेकजण विविध उपक्रमाने साजरा करतात. जि. प. सदस्य रोहित पवार यांनी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपरिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. सोबतच प्रत्येक शाळेत वृक्षरुपी भेट देवून पर्यावरणाचा संदेशही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त दिला गेला. 

सर्व शाळांमध्ये संबधित शाळेचे मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

अजितदादा पवार यांनी यापूर्वी अनेक खात्यांवर धडाडीने काम केले आहे. विलक्षण वेगाने काम करण्याची हातोटी दादांकडे असून त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. अशा नेत्याचा वाढदिवस हा अशा अभिनव उपक्रमांनी आम्हाला साजरा करायला मिळाला याचा आनंद असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

तालुक्यातील 284 जिल्हा परिषद शाळा, 416 अंणवाडय़ा, 9 नगरपरिषद या शाळांतील एकूण 30,000 विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात तालुक्यातील  जि. प अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदाताई खराडे, उपनगराध्यक्ष जय पाटील, जि. प. सदस्य प्रमोद काकडे, भारत खैरे, रोहिनी तावरे, मिनाक्षी तावरे, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी सहभागी होवून रोहित पवारांचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

Related posts: