|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कालव्याच्या आवर्तनाने शेतकरी समाधानी

कालव्याच्या आवर्तनाने शेतकरी समाधानी 

वार्ताहर/ नीरा

पुणे जिह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील नीरा डावा कालव्यावर सिंचनासाठी अवलंबून असलेल्या शेतीसाठी  नुकतेच  खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. खरीपातील पिकांना पाणी  देण्याची आवश्यकता असल्यामुळे  जलसंपदा  विभागाने  हे आवर्तन सोडण्याचे नियोजन  केले असल्याचे जलसंपदा   विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नीरा डावा कालव्यातून नुकतेच चालू खरीप हंगामासाठी आवर्तन सोडल्याने या भागातील  शेतकऱयांची  चिंता  मिटली  आहे. 

पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातूर झालेला होता. शेतकरी पवसाची आतुरतेने वाट पाहत होता. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु  धरण क्षेत्रात सुरु असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे  भाटघर धरणाच्या पाणी साठयात वाढ झाली. त्यामुळे जलसंपदा विभागाने खरीप पिकासाठी आवर्तन सोडल्याने शेतकरी लागवड करण्यास लागला आहे.

आज अखेर भाटघर धरणात एकूण 57.97 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. भाटघर धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता  23752 दशलक्ष घनफूट आहे. त्यापैकी 250 दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 23502 दशलक्ष घनफूट आहे. आज (22) अखेर भाटघर धरणामध्ये 13874 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून पैकी  13624 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. आज अखेर भाटघर धरण क्षेत्रात 380 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

नीरा देवघर धरणामध्ये 186 दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 11729 दशलक्ष घनफूट आहे. आज (22) अखेर नीरा देवघर  धरणामध्ये एकूण 7070 दशलक्ष घनफूट  पाणीसाठा असून पैकी  6884 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. आज अखेर एकूण 58.69 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. आज अखेर नीरा देवघर धरण क्षेत्रात 189 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.                             वीर धरणाची  एकूण पाणी साठा  क्षमता 9835 दशलक्ष घनफूट आहे.त्यापैकी 428  दशलक्ष घनफूट मृत पाणी साठा असून उपयुक्त पाणी साठा 9407 दशलक्ष घनफूट आहे. आज (22) अखेर वीर धरणामध्ये 6135 दशलक्ष घनफूट  पाणीसाठा असून पैकी  5707 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण 60.67 टक्के पाणी साठा आहे. वीर धरण क्षेत्रात आजअखेर 84 मि.मी पाऊस पडल्याने शेतकऱयांना काही प्रमाणात का होईना  दिलासा मिळाला आहे.

Related posts: