|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड

मद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

रविवार पेठेतील सुसरबागेत शनिवारी रात्री उशिरा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या रागातून मद्यधुंद तरुणांच्या टोळीने कार, दुचाकीची मोडतोड केली. याप्रकरणी संशयित आरोपी इम्रान युनुस मणेर, लुकमान शकील सोलापुरे आणि सुमित उमर डांगे (सर्व रा. जय शिवराय चौक, भुई गल्ली, रविवार पेठ) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कार, दुचाकी तोडफोडीची फिर्याद दशरथ भोसले यांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रविवार पेठेत सुसरबागेत भाजी मंडईत या परिसरात एका गुंड टोळीचा वावर वाढला आहे. त्यातूनच रात्री उशिरा सायरन काढून मोटारसायकल फिरवणे, वाढदिवसांच्या नावाखाली चौकात उशिरापर्यत गोंधळ घालण्याचे प्रकार या टोळीकडून सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी या टोळीतील एकाच्या वाढदिवसानिमित्त रात्री भाजी मंडईतील व्यापाऱयाची टोमॅटोची अख्खी टोपली टोळीने नेली होती. चौकात नेवून ती रिकामी केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुसरबागेतील किरण बाडकर यांच्या घरात घुसून टोळीतील काही जणांनी बाडकर कुटुंबातील महिलांसह इतरांना मारहाण केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे; पण अद्यापी पोलिसांकडून संशयितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. दिवसोंदिवस या टोळीशी दहशत वाढू लागली आहे. त्यातूनच सुसरबागेत रविवारी पहाटे कार, दुचाकी फोडण्याची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुसरबाग भाजी मंडईत बांधकाम व्यावसायिक दशरथ जयवंत भोसले यांचे घर आहे. त्यांच्या घरातून भाजी मंडईतील एका व्यापाऱयाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. या भाजी मंडईसाठी व्यापाऱयांनी पलंगे नावाचा वॉचमन नेमला आहे. शनिवारी रात्री गुंडांची टोळी दारू पिण्यासाठी मंडईत बसली. रात्री उशिरापर्यत त्यांची बडबड सुरू होती. त्यामुळे दशरथ भोसले यांनी संबंधितांना बराच उशीर झाला आहे, निघून जा, असे सांगितले. त्यानंतर भोसले यांनी मंडईत दिलेले वीज कनेक्शन बंद केले. दरम्यान, त्यानंतर या टोळीने वॉचमन पलंगे यांना धमकी देत पुन्हा वीजपुरवठा सुरू केला, त्यानंतर त्यांचे दारू पिणे पहाटेपर्यत सुरू होते. पहाटे चारच्या सुमारास या टोळीने भोसले यांची दारात लावलेली मारूती कार (एम.एच.12 पी 3441) फोडली. कारच्या चारही बाजूच्या काचा मोठे दगड टाकून फोडल्या. बाळासाहेब अशोक मुधोळकर यांची व्हिगो (एम.एच.09 सीबी 9912) मोपेड दगड टाकून फोडली आहे. जाताना या टोळीने नावे सांगितलास तर बघून घेईन, अशी धमकी दिली. त्यानंतर ते निघून गेले. रविवारी सकाळी वाहने फोडल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर सुसरबागेत या टोळीच्या दहशतीसंदर्भात नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.

चौकट पान एकवरच घेणे

संशयित आरसी गँगशी संबंधित असण्याची शक्यता

सुसरबागेत दहशत माजवणारे तरूण हे ‘आरसी’ गँगशी संबंधित असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गुंडांच्या या टोळीशी दहशत परिसरात वाढू लागली आहे. मद्यधुंद स्थितीत रात्री उशिरापर्यत गोंधळ घालणे, सायलेन्सर काढून वाहन चालवणे आदी प्रकार या टोळींकडून सुरू असल्याने येथील शांतता भंग झाली आहे. नागरिक भीतीने या टोळीसंदर्भात फारसे बोलत नव्हते. व्यापाऱयांच्या भाजीपाल्याचे नुकसान करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, मारहाण, धमकी आदी
प्रकार या टोळीकडून सुरू असून या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून वाढत आहे.

Related posts: