|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिकार गेली अन् शिकारीही

शिकार गेली अन् शिकारीही 

प्रतिनिधी/ वेंगुर्ले

कुत्र्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱया बिबटय़ाला प्राण गमवावे लागल्याची घटना रविवारी पहाटे दाभोली-नागडेवाडी येथे घडली. कुत्र्याचा पाठलाग करतांना त्याच्यासह बिबटय़ाही कठडा नसलेल्या विहिरीत पडला. वीस फूट खोल पाणी असलेल्या विहिरीत बुडून दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मृत बिबटय़ा व कुत्र्याला बाहेर काढले.

दाभोली-नागडेवाडी येथील मुरारी श्रीहरी पेडणेकर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याने जाग आली. काहीवेळाने त्यांच्या घरानजीक असलेल्या विहिरीत काहीतरी पडल्याचे ऐकू आले. मात्र, काळोख असल्याने भीतीपोटी त्यांनी विहिरीत डोकावूनही पाहिले नाही. पहाटे त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना विहिरीत बिबटय़ा आणि त्यांचा कुत्रा पडल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची कल्पना पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांना दिली. त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले. त्यानुसार सकाळी आठ वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. बिबटय़ा पडल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

विहिरीत सुमारे 20 फूट पाणी आहे. पडलेला बिबटय़ा व कुत्रा विहिरीच्या तळाला गेले होते. बिबटय़ा मृतावस्थेत होता. तर कुत्रा जिवंत होता. मात्र, तोदेखील नंतर गतप्राण झाला. सकाळी आठ वाजता कुडाळचे वनक्षेत्रपाल पी. जी. कोकितकर, मठ वनपाल रामचंद्र मडवळ, मठ वनरक्षक वि. श. मराठे, तुळसचे वनरक्षक सावळा कांबळे, नेरुरचे वनरक्षक सा. बा. दळवी, सो. म. सावंत, स. वा. इब्रामपूरकर, शंकर पाडावे यांची टीम घटनास्थळी पोहोचली. वनविभागाच्या एका कर्मचाऱयाने विहिरीत उतरून बिबटय़ाला दोरी लावून वर काढण्याचा प्रयत्न केला. पण 30 फूट खोल विहीर आणि 20 फुटापर्यंत पाणी असल्याने तो प्रयत्न असफल ठरला. शेवटी ग्रामस्थ प्रफुल्ल बांदवलकर, प्रसाद हळदणकर, प्रवीण बांदवलकर, विठ्ठल गोवेकर यांनी पाण्यात उतरून विहिरीच्या तळाशी गेलेल्या बिबटय़ाला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. वेंगुर्ले पं. स. च्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ठाकुर व त्यांच्या सहकाऱयांनी पोस्टमार्टेम केल्यानंतर मठ येथील शासकीय जंगलात दहन करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सरकुंडे व कोलते उपस्थित होते.

                             बिबटय़ा बाहेर, कुत्रा विहिरीतच

 विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. बिबटय़ाला स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. मात्र, तळाशी गेलेल्या कुत्र्याचा सर्वांनाच विसर पडला. त्यामुळे तळाशी गेलेला कुत्रा पाण्यावर कधी येतो, याची प्रतीक्षा होती.

                          अलिकडच्या काळातील मोठा बिबटय़ा

 यासंदर्भात बोलतांना मठ वनपाल रामचंद्र मडवळ म्हणाले, अलिकडच्या काळात सापडलेल्या बिबटय़ांपैकी हा सर्वात मोठा होता. पाच ते सव्वासहा वर्षाचा हा नर होता. जिल्हय़ात सध्या बिबटय़ांची संख्या वाढते आहे. 2000 च्या सुमारास दोडामार्ग येथे पट्टेरी वाघाचे पिल्लू सापडले होते. त्याचे नामकरण ‘दोडा’ असे करून त्याला पुण्यात पाठविण्यात आले होते. वेतोरे येथे 2011 मध्ये बिबटय़ा फासकीत सापडला होता. भटवाडी येथेही बिबटय़ाने जनावरांचा फडशा पाडला होता. कोचरा, बांदा येथेही बिबटय़ा सापडला होता. रात्रीच्या वेळी अनेकांना बिबटय़ा दर्शन देतात. याचा अर्थ येथे बिबटय़ांची संख्या वाढत

Related posts: