|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » विदेशी गुंतवणुकीत 23 टक्के वृद्धी

विदेशी गुंतवणुकीत 23 टक्के वृद्धी 

नवी दिल्ली :

 एप्रिल ते मे या चालू आर्थिक वर्षातील कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीत 23 टक्क्यांनी वाढ झाली. एफडीआय या दोन महिन्यात 10.02 अब्ज डॉलर्सची होती. 2016-17 या आर्थिक वर्षात 60.08 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक देशात करण्यात आली असे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारकडून इन्व्हेस्टर्स प्रेन्डली पॉलिसी तयार करण्यात आली आहे. काही निवडक क्षेत्रे पूर्णतः खुली करण्यात आलेली नाहीत. मात्र अनेक क्षेत्रात 100 टक्के एफडीआय असल्याने अनेक क्षेत्रे विदेशी गुंतवणूकदारांसाठी खुली आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी असणाऱया विदेशी गुंतवणूक प्रमोशन महामंडळाला बरखास्त करण्यात आले. या मंडळाकडे असणारे अनेक प्रस्ताव आपल्या मंत्रालयाकडे आले आहेत. ते सोडविण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. एप्रिल-मे कालावधीत भारतातील अन्नपदार्थ क्षेत्रात 182.4 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. याचबरोबर अन्नप्रक्रिया क्षेत्रात 187.9 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. अन्नप्रक्रिया क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली आहे.