|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू

पाकिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू 

लाहोर

 पाकिस्तान पुन्हा एकदा दहतशवादी हल्ल्याचा शिकार ठरला. लाहोरमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानानजीक झालेल्या आत्मघाती स्फोटात कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला. तर या स्फोटात जवळपास 30 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला पोलीस दलाला लक्ष्य करत झाल्याचे असून हा आत्मघाती स्वरुपाचा असल्याचे लाहोर पोलीस प्रमुख अमीन वेनस म्हणाले. बचावपथकानुसार या स्फोटात 20 जण मारले गेले असून यात पोलीस कर्मचाऱयांचा समावेश आहे. पोलीस कर्मचारी आणि लाहोर विकास प्राधिकरणाचे अधिकारी अतिक्रमण हटवत असताना हा शक्तिशाली स्फोट झाला. बचावपथकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले असून शहराच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले, स्फोट झाला त्यावेळी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानी चाललेल्या एका बैठकीला संबोधित करत होते.

 

Related posts: