|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माधव गावकरांच्या मैफिलीत शास्त्राrय रंग

माधव गावकरांच्या मैफिलीत शास्त्राrय रंग 

प्रतिनिधी/ कणकवली

ज्येष्ठ शास्त्राrय गायक आणि अभ्यासक माधव गावकर यांच्या गायन मैफिलीत शास्त्राrय आणि उपशास्त्राrय गायनाचे रंग भरले गेले. प्रत्येक रागाचे गावकर यांनी यावेळी विश्लेषण केल्यामुळे अनोखा संगीत नजराना उपस्थित रसिकांना या मैफिलीत भेट मिळाला. येथील गंधर्व फाऊंडेशनने आशिये दत्त मंदिरच्या सभागृहात आयोजित केलेल्या या मैफिलीला रसिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला.

स्वातंत्र्य सैनिक श्रीराम गवंडळकर यांच्या स्मरणार्थ डॉ. आनंद गवंडळकर यांनी सहयोग दिलेल्या या मैफिलीचा प्रारंभ गावकर यांनी भूप रागाने केला. यावेळी त्यांनी तो सादर करण्यापूर्वी त्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यात त्यांनी बंदिशीच्या भाषेविषयी मांडणी केली. त्यानंतर भूप रागाचा तराणा सादर केला. या रागाची माहिती देऊन तो गावकर यांनी सादर केल्यामुळे उपस्थितांना राग समजून घेता आलाच परंतु त्यामुळे गायन सादरीकरणाचाही आनंद लुटता आला.

शास्त्राrय गायनानंतर गावकर यांनी उपशास्त्राrय गायन सादर केले. यात त्यांनी झपतालातील प्रेम वरदान हे नाटय़गीत सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातून अजरामर झालेले ‘अशी सखी सहचरणी’ हे नाटय़गीत त्यांनी सादर केले. उत्तरोत्तर मैफिल रंगत गेली असतानाच यावेळी गावकर यांनी हार्मोनियमवर ‘नरवर कृष्णा समान, सुरत पिया’ आदी नाटय़गीते सादर करून त्यांनी मैफिलीत हार्मोनियमच्या सुरावटीचेही रंग भरले. गावकर यांनी ‘अच्युता केशवा नारायणा’ या भैरवीने मैफिलीची सांगता केली. मैफिलीला तबला साथ प्रसाद मेस्त्राr यांनी केली. कार्यक्रमाला गंधर्व फाऊंडेशनच्या पदाधिकाऱयांसह बहुसंख्येने रसिक वर्ग उपस्थित होता.