|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डॉक्टर्सनी तपासला स्वतःचाच फिटनेस

डॉक्टर्सनी तपासला स्वतःचाच फिटनेस 

कुडाळ : कुडाळ तालुका मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर प्रॅटर्निटी क्लब (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने दीप अमावास्येनिमित्त डॉक्टर व त्यांच्या कुटुंबियांसाठी दहा किमी सायकलिंग व पाच किमी चालणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कुडाळ येथील डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. अमोघ चुबे व डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ व जिल्हय़ातील डॉक्टरांसाठी कुडाळ-एमआयडीसी येथे हा उपक्रम घेण्यात आला. तरुणांबरोबर ज्येष्ठ डॉक्टर मिळून 72 डॉक्टर व कुटुंबियांचा समावेश होता. वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले डॉ. ए. जी. सवदत्ती तसेच डॉ. सुधीर राणे यांनीही सायकलिंग करून तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला.

सकाळी सहा वाजता येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयाकडून दहा किमी पाट रस्त्यावर सायकलिंग केल्यानंतर पाच किमी धावणे व चालणे ही स्पर्धा होती. डॉ. रावराणे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. अमोघ चुबे, डॉ. संजय सावंत, डॉ. संतोष जाधव, डॉ. योगेश नवांगुळ, डॉ. गिरीश बोर्डवेकर, डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती व डॉ. प्रशांत कोलते यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

डॉ. रावराणे व डॉ. प्रशांत मडव यांच्या संकल्पनेतून सायकलिंग व धावणे अशी एकत्रित स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिला डॉक्टरनीही सहभाग घेतला. डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. जयेश स्वार व शंकर सावंत या सावंतवाडीच्या पथकाने सावंतवाडी ते कुडाळ व पुन्हा सावंतवाडी असा प्रवास सायकलने केला. डॉ. रमेश परब, डॉ. संजय निगुडकर, डॉ. पी. डी. वजराटकर, डॉ. रुपेश धुरी, डॉ. जी. टी. राणे या डॉक्टरनी स्पर्धा पूर्ण केली. अशाप्रकारच्या वीस किमी सायकलिंग व दहा किमी धावणे-चालणे स्पर्धा जिल्हय़ात आयोजित करण्याचा मानस रांगणा रनर्सचे डॉ. प्रशांत मडव व डॉ. अभिजीत वझे यांनी व्यक्त केला. डॉ. सुबोधन कशाळीकर व पुष्कर कशाळीकर यांनी सायकल व चालताना लागणाऱया सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. मालवणचे डॉ. हरीश परुळेकर, डॉ. राहुल वझे, डॉ. सोमनाथ परब, तर देवगडहून डॉ. संजीव देसाई व डॉ. किरण पाटणकर यांनी सहभाग घेतला.

Related posts: