|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या

गृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या 

तरवळ येथील घटना

घरावर होते 5 लाखांचे कर्ज

चिठ्ठीतील मजकुरामुळे संभ्रमावस्था

प्रतिनिधी /रत्नागिरी

तालुक्यातील तरवळ-कुळ्येवाडी येथील शेतकऱयाने गृहकर्जाच्या बोजामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. सुभाष देवजी कुवार (40) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे. दरम्यान, कुवार यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतील मजकुरामुळे संभ्रमावस्था व गुंतागुंत वाढली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी कुटुंबातील सुभाष कुवार हे पेंटर व्यावसायिक होते. हे सोमवारी रात्री जेवून झोपले होते. यानंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने पाहीले असता सुभाष तेथे नव्हते. सुभाष यांना पाहण्यासाठी त्या दरवाजा उघडून बाहेर आल्या. यावेळी सुभाष यांनी अंगणामध्ये मंडपाच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जाकादेवी येथे शवविच्छेदन करण्यात आले.

आत्महत्येची घटनेचे वृत्त समजल्यावर पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी यांनी घटनास्थळी भेट दिली. सुभाष यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यांच्याकडे सापडली. यामध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवल्याचे तपास अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सुभाष कुवार यांच्यावर दोन कर्जे असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये सेंट्रल बँकेचे 5 लाखांचे तर अन्य एक 23 हजाराच्या कर्जाचा समावेश आहे. 5 लाखांचे कर्ज त्यांनी घरावर घेतले होते. तसेच 23 हजारांचे कर्ज कशावर घेतले होते याचा तपास करण्यात येत आहे. मात्र, त्यांचे कर्जाचे हफ्ते थकलेले नव्हते, असेही आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.

चिठ्ठीतील मजकुरामुळे संभ्रमावस्था

शिवाजी तानाजी कुवार याला आपण 50 हजार रूपये दिले आहेत. मात्र 3 वर्षात त्याने यातील एकही रूपया परत केलला नाही. हे संरपंच सुवर यांना माहिती आहे. आपण याबाबत त्यांच्याशी बोललो आहे, असा मजकूर असलेली चिठ्ठी कुवार यांच्याजवळ सापडली आहे. मात्र, त्यात नेमके काय म्हणायचे आहेत हे स्पष्ट होत नसल्याने संभ्रम वाढला आहे.

Related posts: