|Friday, July 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एकाच दिवशी पाच हजार नव मतदारांची नोंदणी

एकाच दिवशी पाच हजार नव मतदारांची नोंदणी 

प्रतिनिधी/ सांगली

जिल्हयात शनिवारी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमते तब्बल 5 हजार नवमतदारांनी नोंदणी केली. यामध्ये 18 ते 19 वर्ष वयोगटातील नवमतदारांची संख्या 2271 तर 20 वर्षाच्या वरील वयोगटातील नवमतदारांची संख्या 2945 इतकी आहे. दरम्यान 1 जुलै ते 22 जुलै या काळात जिल्हयातील 14 हजार 170 नव मतदारांनी नोंदणी केली आहे. तर 1 जानेवारी ते 22 जुलै अखेर 13 हजार मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

निवडणूक विभागाच्या वतीने 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत युवा मतदार नोंदणी अभियान राबविण्यास येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच युवकांच्यात मतदान करण्याबाबत जागृकता निर्माण व्हावी हा यामागे प्रमुख उद्देश आहे. जिह्यातील 2402 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची याकरिता नियुक्ती करण्यात आले आहे. जिह्यातील सर्व महाविद्यालयात प्रवेशासमवेतच मतदार नोंदणीचा फॉर्म विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची एक बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. दरम्यान 22 जुलै रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 5 हजार 2216 युवा मतदारांनी नोंदणी केली.

याशिवाय 1 ते 21 जुलै या कालावधीत 8955 जणांनी मतदार म्हणून नोंदणी केली. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील 5668 जणांचा समावेश होता. तर 20 वर्षावरील 3287 जणांनी नोंदणी केली. बावीस दिवसात 14 हजार 170 युवा मतदारांनी नोंदणी केली आहे. याशिवाय मयत मतदारांची नावे वगळण्यासाठीही मोहिम राबविण्यात येत आहे. 1 जानेवारी पासून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या कालावधीत सुमारे 13 हजार मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

Related posts: