|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्य नाटय़संगीत स्पर्धेत श्रध्दा जोशी प्रथम

राज्य नाटय़संगीत स्पर्धेत श्रध्दा जोशी प्रथम 

प्रतिनिधी/ मिरज

नटसम्राट बालगंधर्व यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व संगीत रसिक मंडळ ,पुणे यांच्यावतीने आयोजीत नाटय़संगीत स्पर्धेत येथील श्रध्दा विकास जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून निवडलेले 12 स्पर्धक सहभागी होते.

   बालगंधर्व यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत स्पर्धेत श्रध्दा जोशी हिने ‘स्वयंवर’ नाटकातील ‘नाथ हा माझा मोही’ हे पद आणि ‘संगीत विद्याहरण’ नाटकातील ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ हे पद बहारदारपणे पेश केले होते. स्पर्धेतील सर्व स्पर्धकांमध्ये श्रध्दा जोशी हिचा आवाज आणि सादरीकरणाची पध्दत यांना परिक्षकांनी दाद दिली. तिला प्रथम क्रमांक मिळाला. तिला रेल्वेमंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते पारितोषक देण्यात आले.

  श्रध्दा जोशी ही मिरजेतील उदयोन्मुख गायक आणि नाटय़कलाकार आहे. ाr मंगला जोशी यांच्याकडे नाटय़संगीताचे धडे घेत आहे. आजवर तिने शारदा, संशयकल्लोळ या नाटकांमध्ये केलेल्या भूमिकांबद्दल पारितोषके पटकावली आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने संगीत विशारद पूर्ण केले आहे. सध्या ती शिवाजी विद्यापीठाच्या ललित कला विभागात संगीत विषयात एम. ए. करीत आहे. लहान वयातच तिने गायन आणि नाटय़क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक होते. तिच्या या संगीत विषयक वाटचालीत आई वडिलांसह ऋषिकेश बोडस, मंगला जोशी, चंद्रकांत धामणीकर, शशांक लिमये, शरद बापट यांचा वाटा आहे.

Related posts: