|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत गढूळ आणि आळयामिश्रित पाणीपुरवठा

सांगलीत गढूळ आणि आळयामिश्रित पाणीपुरवठा 

प्रतिनिधी/ सांगली

शहरातील वडरगल्ली न्यु सर्वोदय कॉलनी येथे मंगळवारी गढूळ आणि आळयामिश्ा्रित पाणीपुरवठा झाला. या पाण्यामुळे नागिरांतून संताप व्यक्त करण्यात आला. महापालिका पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ गेल्या अनेक महिन्यापासुन सुरूच आहे.

   नदीला पाणी असूनही शहरात पाणीटंचाई सुरू असून काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना आत्ता गढूळ आणि आळयामिश्रित पाणीपुरवठा होवू लागला आहे. मंगळवारी शहरातील वडगरल्ली येथील न्यू सर्वोदय कॉलनीमध्ये नळांना गढूळ आणि आळयामिश्ा्रित पाणीपुरवठा झाला.

या भागातील अनेक घरांमध्ये अशाप्रकारे नळांना गढूळ पाणीपुरवठा झाल्या. या दुषित पाण्यामध्ये नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या पावसाळी दिवस आहेत. त्यामुळे नदीचे पाणी दुषित आणि गढूळ झाले आहे. मात्र महापालिकेने पुरेसे क्लोरीन वापरणे आवश्यक आहे. मात्र शुध्दिकरणाची प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याने तसेच पाणीपुरवठयाच्या अंतर्गत पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे वारंवार त्या लिकेज होत आहे. यामुळेही पाणीपुरवठा गढूळ आणि दुषित होत असल्याचे सांगण्यात आले.

मनपाने पुरेसा आणि शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी माळबंगला येथे 56 आणि 70 एमएलडी प्रकल्प उभारले असून यातील 56 एमएलडी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे मात्र अध्यापाही पाणीपुरवठा दुषितच होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत व शुध्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा  वडरगल्ली येथील युवा नेते अमर निंबाळकर यांनी दिला आहे.

Related posts: