|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सोना ऍलाईज कंपनीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त

सोना ऍलाईज कंपनीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त 

वार्ताहर/ लोणंद

खासदार उदयनराजे भोसले स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाले. उदयनराजेंना अटक झाल्याचे समजताच लोणंद येथील सोना ऍलाईज कंपनी व परिसरात चौकाचौकात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

   लोणंद औद्योगिक वसाहतीतील सोना ऍलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजेंनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता; पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. मंगळवारी उदयनराजे स्वतःहून पोलिसांत अटक झाल्यावर लोणंद परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रकार घडू नये, यासाठी लोणंदच्या चौकाचौकात व सोना कंपनीच्या गेटवर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोणंद औद्योगिक वसाहतीमध्ये सोना अलॉईज कंपनी 2009 मध्ये चालू झाली असून कंपनीत लाल मातीच्या मिश्रणाने कच्चे लोखंड तयार केले जाते. पंपनीत 1500 कामगार काम करीत असून त्यातील 450 ते 500 कामगार परमनंट आहेत. याच कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी स्वतःहून पोलिसांत जाऊन अटक झाल्यावर लोणंद परिसरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी 4 पोलीस अधिकारी व 50 पोलीस कर्मचारी असा चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related posts: