|Saturday, August 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाचा अभिनव प्रयोग

स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाचा अभिनव प्रयोग 

भोपाळच्या पियुष अग्रवाल या उच्च-शिक्षित युवकाने महानगरांशिवाय छोटेखानी शहरांमध्ये स्थानिक युवकांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सुपर प्रोफ्स’ या मार्गदर्शन संस्थेची स्थापना करून त्याद्वारे जिल्हा स्थानासह मध्यम आकाराच्या शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षा व निवड परीक्षांसाठी सरावासह मार्गदर्शनाचा अभिनव प्रयोग यशस्वीपणे अमलात आणला
आहे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदवी व स्टेनफोर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या पियुष अग्रवाल यांनी सध्या संवादविषयक तंत्रज्ञानासह संगणकशास्त्राचा विकास झालेला तरी या प्रगतीचा फायदा छोटय़ा शहरातील व प्रसंगी ग्रामीण भागातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध स्वरुपात घेण्यात येणाऱया स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांना कशा प्रकारे करून देता येईल यावर गंभीरपणे विचार करून त्यानुसार काही तरी ठोस करण्यास सुरुवात केली व त्यातूनच पियुष अग्रवाल यांच्या अभिनव उपक्रमाला मूर्त स्वरूप मिळत गेले.

विचारांती 2010 मध्ये पियुष अग्रवाल यांनी ‘सुपर प्रोफ्स’ या अद्ययावत स्वरुपाच्या पण छोटेखानी रूपातील छोटय़ा शहरातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने असणाऱया शैक्षणिक-मार्गदर्शक उपक्रमाची सुरुवात केली. या संदर्भात छोटय़ा शहरांमधील हुशार व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेता केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वर्षभर घेण्यात येणाऱया विविध स्तरावरील आणि विविध स्वरुपाच्या केंद्र सरकारच्या कर्मचारी, निवड विषयक स्पर्धा परीक्षांशिवाय चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेपेटरी, ‘गेट’ यासारख्या निवड-स्पर्धा विषयक स्वरुपाच्या परीक्षांच्या संदर्भात पण मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

पियुष अग्रवाल यांचे आयआयटी-कानपूरचे सहाध्यायी सुजीत कुमार त्यांच्या या ‘सुपर प्रोफ्स’ उपक्रमात 2011 मध्ये सहभागी झाल्यावर या उपक्रमाला अधिक व्यापकता मिळत गेली. त्यानंतरच्या टप्प्यात ‘सुपर प्रोफ्स’चे मुख्यालय दिल्लीत स्थलांतरीत करण्यात आले व त्यामुळे या मार्गदर्शक उपक्रमाला देशव्यापी स्वरूप प्राप्त
झाले.

सद्य स्थितीत ‘सुपर प्रोफ्स’ ने ग्रामीण-शहरी भागातील युवा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला विश्वास म्हणजे या क्षेत्रातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आता विविध स्पर्धा परीक्षा देऊन त्याद्वारे आपले भविष्य वा करिअर घडविण्यासाठी आता मुंबई, दिल्ली, बेंगलोर, पुणे यासारख्या महानगरातच जाण्याची गरज नसून त्यांना आपल्या राहत्या शहरी व गरजेनुसार स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करता येऊन त्यामध्ये त्यांना यशस्वीसुद्धा होता येऊ शकते.

आपल्या या साऱया उपक्रमाच्या पूर्व-तयारीच्या संदर्भात पियुष अग्रवाल नमूद करतात की त्यांनी अमेरिकेत असताना अशा स्वरुपात व छोटय़ा शहरातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुरूप स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन करण्याचा जेव्हा प्राथमिक स्वरुपात विचार केला तेव्हा त्यामागे विशेष असा व्यावसायिक उद्देश नव्हता. मात्र महानगरांशिवाय मध्यम छोटी शहरे व ग्रामीण भागातील हुशार व करिअरच्या संदर्भात काहीतरी नवे व वेगळे करावे अशी मनोमन इच्छा असणाऱयांना मार्गदर्शन-मदत करावी असे त्यांना वाटत होते व त्यातून त्यांची भारतात ‘स्वदेश वापसी’ झाली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

सुरुवातीला पियुष अग्रवाल यांनी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह आपल्या उपक्रमाला सुरुवात केली. यामुळे ‘सुपर प्रोफ्स’ ची सुरुवात तर झाली पण त्याला अधिक व्यापकता लाभण्यासाठी अधिक निधीची जरुरी होती. त्यादृष्टीने ‘स्टार्ट अप’ योजनेंतर्गत ‘सुपर प्रोफ्स’ साठी 2012 मध्ये अँगल नेटवर्क तर्फे 3 कोटी रुपयांचा निधी जमा केला गेला. त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऍप व वेबसाईटद्वारे करिअर व स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात माहितीचे आदान प्रदान अधिक सुलभ पद्धतीने व विस्तारपूर्वक करणे शक्मय झाल्याने योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थी उमेदवारांची विशेष सोय झाली.

‘सुपर प्रोफ्स’ च्या या प्रयत्नांना व विशेष म्हणजे त्यांनी माहिती तंत्रज्ञानासह पियुष अग्रवाल व त्यांच्या सहकाऱयांनी केलेल्या प्रयत्नांची विविध स्तरावर विशेष नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एमआयटी-रिव्हय़ूः 2016 या सर्वेक्षणांतर्गत जागतिक स्तरावरील 35 प्रमुख तंत्रज्ञान-संशोधकांना मिळालेल्या सन्मानांमधील समावेश, डेलॉईट टेक्नॉलॉजी या व्यवस्थापन संस्थेतर्फे भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱया तंत्रज्ञान कंपनीचा बहुमान इ. चा समावेश करावा लागतो.

आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत माहिती शास्त्राची जोड व त्याला परिश्रमी कर्तबगारीची साथ मिळाल्याने ‘सुपर प्रोफ्स’ तर्फे गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार 3,000 ते 80,000 रु. च्या शुल्कात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येत असून त्याचा लाभ घेणाऱयांच्या संख्येत होणारी वाढ या उपक्रमाच्या यशावर व निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनपर गरजांवर अवश्य शिक्कामोर्तब करते.

Related posts: