|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रोहित पाटील यांची निवड

रोहित पाटील यांची निवड 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांची जिल्हा युवक ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व सरचिटणीस अनिल साळोंखे, प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

पाटील हे गेल्या 7 वर्षापासून विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि 3 वेळा शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी परीषदेचे चेअरमन पदाची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा घेवून निवड  करण्यात आली आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, सरचिटणीस अनिल साळुंखे, माजी खासदार निवेदीता माने, आमदार संध्यादेवीड कुपेकर आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

Related posts: