|Monday, April 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रिपाईच्यावतीने राधानगरी तहसिलवर आंदोलन

रिपाईच्यावतीने राधानगरी तहसिलवर आंदोलन 

प्रतिनिधी/ राधानगरी

राधानगरी तालुका रिपब्लिकन पार्टी (ए) यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी राधानगरी तहसिल कार्यालयावर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, तालुकाध्यक्ष कुंडलिक कांबळे यांनी मागणींचे निवेदन दिले. यावेळी पोलिस निरिक्षक एस. एस. सुर्वे उपस्थित होते.

केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यातील मागासवर्गीय बेरोजगारांचे कर्ज शासनाने माफ करावे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थीक विकास महामंडळ, क्रांतीबा जोतिबा फुले आर्थीक विकास महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, आदीवासी आर्थीक विकास महामंडळ, अपंग आर्थीक विकास महामंडळ, ओबीसी आर्थीक विकास महामंडळ या मागासवर्गीय महामंडळाची 635.99 कोटींची कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सुरेश कांबळे, राम माजगांवकर, दिलीप कोथळीकर, अंकुश कांबळे, उत्तम कांबळे, गजानन सुतार, संजय पुंगावकर, वसंत कांबळे, सागर कांबळे, सुनिल कांबळे, शिवाजी कांबळे, सुरेश कांबळे, दयानंद कांबळे, नारायण वाघवडेकर, तानाजी कांबळे, साताप्पा कांबळे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

 

 

 

 

Related posts: