|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 38 लाखांची विदेशी दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 38 लाखांची विदेशी दारू जप्त 

सोलापूर / प्रतिनिधी

गोव्यातून बेकायदेशीररित्या आणलेली 38 लाख रूपये किंमतीचा विदेशी दारू साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. यात तीन वाहनांसह तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई उत्तर सोलापूरातील देगाव येथे बुधवारी पहाटे साडेतीन वाजता केली आहे.

सोमनाथ तुकाराम भोसले (वय 32), समाधान तुकाराम भोसले (वय 29) (दोघे रा. खवणी, मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश दिगंबर डोंगरे (वय 23, रा. आढेगाव, मोहोळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱयांकडून माहिती मिळाल्यानंतर देगाव येथे सापळा रचला. पहाटे साडेतीनच्या सुमारास देगाव येथील देशमुख वस्तीजवळ तीन ट्रक थांबले होते. ट्रकची तपासणी केली असता, यामध्ये गोवा राज्य निर्मीतीचे विदेशी दारू बेकायदेशीररित्या विक्रीसाठी सोलापूर आणले होते. आयरश ट्रक (क्र. एमएच. 13 सीजेö 9022) मध्ये रमच्या 47 बॉक्स, वोडकाच्या 84 बॉक्स असा 18 लाख 31 हजार 343 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

बोलेरो पिकअप (क्र. एमएच 13. सीयु- 0201) मध्ये व्हीस्कीच्या 9 बॉक्स, असे 9 लाख 14 हजार 256 रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच टाटा कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये व्हिस्कीच्या 47 बॉक्स आणि गोल्डन एस ब्ल्यूच्या 42 बॉक्स असे 9 लाख 95 हजार 779 रूपयांचे असे एकूण 37 लाख 41 हजार 378 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघाही आरोपींना दारूबंदी न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात सरकारतर्फे ऍड. बेसकर यांनी काम पाहिले आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविंद आवळे, उप अधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, मलंग तांबोली आदींनी केली आहे. याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे हे करीत आहेत.

Related posts: