|Monday, June 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सोनेरी ग्रुपने दिली तरुणाईला गड-किल्ले संवर्धनाची दिशा

सोनेरी ग्रुपने दिली तरुणाईला गड-किल्ले संवर्धनाची दिशा 

वार्ताहर/ कोरेगाव

sसमाजात व्यसनाधिनता आणि अंधश्रध्देचे प्रमाण वाढत असून आजची तरुणाई गटारीच्या नावाखाली व्यसनांना जवळ करीत असताना याच युवाशक्तीला विधायक दिशा देण्यासाठी कोरेगावच्या सोनेरी ग्रुपने गटारी अमावस्येदिवशी गड-किल्ले संवर्धनाची मोहीम यशस्वी केली  या उपक्रमासाठी कोरेगावातील युवक एकवटले व  ऐन गटारी अमावस्येच्या दिवशी व्यसनांची नशा न करता गड-किल्ले संवर्धनाची दिशा सोनेरी ग्रुपने देत प्रबोधनाचे अस्सल बायनकशी काम ग्रुपच्या नावाप्रमाणेच करुन दाखवले.

            कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील समविचारी एकत्र येवून सामाजिक कामासाठी सोनरी ग्रुप ची स्थापना केली. यामाध्यमातून  भागात अनेक ठिकाणी शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यात ग्रुप नेहमीच पुढचं पाऊल ठेवलं. विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप, अंध शाळेला मदत, संगणक वाटप, गणवेश वाटप,  नेत्र व दंत चिकीत्सा शिबीरे, गुणवंताचा गौरव अशा एक ना अनेक उपक्रमातून सोनेरी ग्रुपचे कार्य झळाळतचं राहीलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेतील गड- किल्यांची आजच्या तरुणाईला नव्याने ओळख व्हावी याठिकाणांचे सर्वधन ही काळाची गरज आहे यासाठी सोनेरी ग्रुपने पुढाकार घेत दर महिन्याला एका गड-किल्यावर जावुन स्वच्छता, वृक्षारोपण, डागडुजी असे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. वर्षारंभी जानेवारीत ज्या किल्यावर शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या ऐतिहासिक रायरेश्वरावर जावून उपक्रमाचा श्रीगणेशा केला.  यामोहिमेनंतर कोरेगावतील युवकांचा प्रतिसाद वाढत गेला व गड किल्यासाठी एक-एक मावळा जुळू लागला. यानंतर पुढे फेब्रुवारीमध्ये सिंहगड, मार्च महिन्यात संतोषगड, एप्रिलमध्ये भुषणगड किल्यावर श्रमदान केल व पवारवाडी पाणी फांऊडेशनच्या श्रमदानात सक्रीय सहभाग घेतला. मे महिन्यात कल्याणगड, जुन महिन्यात मराठय़ांची राजधानी असलेल्या किल्ले अजिंक्यतारा येथे स्वच्छता श्रमदान मोहिम राबवली व मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची सजावट केली तसेच हनुमान मंदिराच्या परिसरात 51 वृक्षांची लागवड केली.

            सामाजिक कामाचा वसा कायम ठेवत जुलै महिन्यात छत्रपती संभाजीमहाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदरवर स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम राबवली गेली. विशेष म्हणजे राज्यभरात सर्वत्र गटारी साजरी करण्याची प्रथा आहे यानिमित्ताने व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे असे असताना गटारीच्या आहारी न जाता दिप अमावस्येचा संदेश देत स्वच्छता व श्रमदान मोहिम राबवली, प्रबोधनपर फलक लावले व छत्रपती संभाजीराजेंना अभिवादन करीत युवा शक्तीचा जागर केला यापुढेही अशा मोहिमा सुरु राहणार असून डिसेंबर अखेरीस किल्ले प्रतापगडावर याची सांगता होणार आहे. यामोहिमेत  सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांच्यासह अध्यक्ष संतोष चिनके, संघटक समीर कुंभार, मनेष निकम, अजय चव्हाण, राजेश दायमा, मंगेश देवकर, मिलिंद बर्गे, पृथ्वीराज बर्गे, अभिजित बर्गे, अजित बर्गे, हेमंत जाधव, भगवान कदम, विक्रांत भोसले, अनिल रोमण, सत्यजित सावंत, ऍड रोहिदास बर्गे, रमेश देशमुख, अधिक बर्गे, डॉ. विघ्नेश बर्गे, अमर देशमुख, रविराज बर्गे, प्रविण बर्गे, अमोल कुंभार, राहूल वाल्मिकी, विकी जठार, अक्षय बर्गे, अनिल साळुंखे, रुपेश सुतार, मयूर जाधव, प्रणव पतंगे, गणेश होनराव, मोहनराव निकम, सुभाषराव जाधव, रुपेश जाधव, राजेंद्र पवार, संदीप सुतार, संतोष चव्हाण, प्रशांत यादव, पवन भोईटे, अनिल बाबर, श्रीनाथ नलावडे, वेदांत बर्गे, विराज बर्गे, साहिल बर्गे, संकेत नलावडे, हर्षा बर्गे, श्रध्दा नलावडे व असंख्य युवकांनी हिरारीने सहभाग घेतला.

Related posts: