प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच आजाराच्या विळख्यात

वार्ताहर/ आनेवाडी
आरोग्य केंद्रे ही रुग्णाच्या औषधोपचार सेवेसाठी असतात. परंतु आनेवाडी ता. जावली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच आजाराच्या विळख्यात असून त्याच्या सभोवतालच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे,
तालुक्यातील सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱया या उपकेंद्रावर अनेक समस्या असून नुकताच सायगाव आरोग्य केंद्राला डॉ. दिलीप वळवी यांच्या योग्य नियोजनामुळे आयएसओ मानांकन मिळाले आहे. तरी सुध्दा आरोग्य विभागची आनेवाडीतील उपकेंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. सायगाव विभागातील सर्व उपकेंद्र चांगल्या पद्धतीने सुरु असून प्रत्येक केंद्राना चांगल्या सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण हे या सरकारी दवाखान्यामध्येच उपचारसाठी येवू लागले आहेत. सर्व सुविधा असताना देखील आनेवाडी उपकेंद्राकडे रुग्णांनी पाठ फिरवली आहे. लहान मुलांची इंजेक्शन, पोलिओ डोस एवढीच सेवा दिली जाते. या उपकेंद्राला जाण्यासाठी हक्काचा रस्ता नाही केंद्राच्या समोरुनच दुर्गुन्धी युक्त गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. अनेकदा केंद्राच्या रसत्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वच पुढारी नेते मंडळी यांनी पाउल टाकले खर पण माशी कुठे शिंकली ते कळलेच नाही, बाजुलाच असलेल्या ओढयात कचऱयाचा ढिग लागला असून त्यामुळे दुर्गुन्धीयुक्त हवा परिसरात पसरली जाते. त्यामुळे राहणाऱया कुटुंबाला तर येथे अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. संबंधित कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी, तोंडी तक्रार देखील केली. विद्यमान ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयांचा कार्यकाल पुढील काही महिन्यात संपत असून जाताजाता का होईना जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्नाचा त्यांच्या कडून निपटारा व्हावा अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत,
चौकट
( तालुक्याचे प्रवेशद्वार, महामार्गालगत असलेल्या बाजार पेठेच्या गावातील आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यासाठी ग्रामसभेत चर्चा करून प्रयत्न नक्की केले जातील. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, त्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याची तयारी असून एकत्र येऊन रसत्याचा प्रश्न निकाली निघेल. –नितिन फरांदे युवा उद्योजक अध्यक्ष भैरवनाथ व्यायाम मंडळ)