|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्रीलंकन नौदलाचे ‘एसएलएनएस सयुराला’ अपतटीय गस्ती जहाज श्रीलंकेकडे रवाना

श्रीलंकन नौदलाचे ‘एसएलएनएस सयुराला’ अपतटीय गस्ती जहाज श्रीलंकेकडे रवाना 

प्रतिनिधी/ वास्को

गोवा शिपयार्डने श्रीलंकन नौदलासाठी बांधलेले ‘एसएलएनएस सयुराला’ हे श्रीलंकन नौदलाचे अपतटीय जलद गस्ती जहाज काल बुधवारी श्रीलंकेकडे रवाना झाले. गोवा शिपयार्डने श्रीलंकन नौदलासाठी बांधलेले हे पहिलेच जहाज आहे. चार दिवसांपूर्वीच या जहाजाचे गोवा शिपयार्डने श्रीलंका नौदलाकडे हस्तांतरण केले होते.

   या जहाजाचे कॅप्टन एएन अमरोसा आणि जहाजावरील कर्मचाऱयांना गोवा शिपयार्डतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी श्रीलंकन नौदल प्रमुख रिअर ऍडमिरल एसएस रणसिंगे, ध्वजाधिकारी एसएमडीके समरवीरा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल, संचालक एस. पी. रायकर व इतर अधिकारी  उपस्थित होते. भारतीय नौदलाचे सुनैयना जहाज कोलंबो पर्यंत श्रीलंकन नौदलाच्या ‘एसएसएनएस सयुराला’ या जहाजाला सोबत देणार आहे.

हे जहाज 2 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे आयोजित केलेल्या सोहळय़ात श्रीलंकेचे अध्यक्ष एच.ई. मैथ्रीपाला सिरिसेना यांच्या उपस्थितीत श्रीलंका नौदलामध्ये अधिकृतरित्या समाविष्ट होणार आहे. या सोहळय़ाला भारताचे संरक्षणमंत्री अरूण जेटली, सुरक्षा उत्पादन सचिव ए. के. गुप्ता, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल शेखर मित्तल उपस्थित असतील.

 

Related posts: