|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमकडून थकित बिल वसुलीची मोहीम

हेस्कॉमकडून थकित बिल वसुलीची मोहीम 

प्रतिनिधी/ बेळगाव

हेस्कॉमच्या ज्या ग्राहकांनी आपल्या विद्युत बिलांची थकबाकी शंभर रुपयांपेक्षा अधिक ठेवली असेल त्यांची विद्युत जोडणी तोडण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी बजावला आहे. या आदेशात म्हटले आहे की, हेस्कॉमने आपल्या थकित बिलांची वसुली करण्यासाठी व्यापक पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने शंभर रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल थकित असल्यास त्वरित विद्युत जोडणी तोडण्यात येणार आहे. यासाठी विद्युत ग्राहकांना त्वरित थकित बिलांचा भरणा करण्यास कळविण्यात आले आहे

Related posts: