|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत केडीसीसी बँक प्रथम

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत केडीसीसी बँक प्रथम 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या, समरगीत स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवारी मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी हॉलमध्ये झाला. या स्पर्धेत कामगार कल्याण मंडळ, सागरमाळ या केंद्राच्या ,केडीसीसी बँकेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.  . या स्पर्धेचे बक्षिस वितरण मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे यांच्या हस्ते व सभागृह नेता प्रविण केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार व त्यांच्या कुटुबियांच्यावतीने विविध उपक्रम राबलवे जात आहेत. बुधवारी मंडळाच्यावतीने समरगीत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्हयातील नऊ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत दुसरा क्रमांक इचलकरंजी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघाने तर तिसरा क्रमांक पुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या संघाने मिळवला.

 प्रथम क्रमांक पटकावलेल्या केडीसीसी बँकेच्या संघाचा नागपूर येथे होणाऱया, राज्यस्तरीय समरगीत स्पर्धसाठी निवड झाली आहे. 9 ऑगष्ट क्रांतीदिनी  नागपूर येथे या स्पर्धा होणार आहे. समरगीत स्पर्धेचे परिक्षक  म्हणून कबीर नाईकनवरे, निशांत गोंधळी, अमोल राबाडे यांनी केले. केएमटीचा कामगार पखाले याला बायपास शस्त्रक्रियेसाठी 25 हजार रूपयाचा धनादेश, केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मिलींद कुलकर्णी,अनिल शिंदे, सुरेश केसरकर, चंद्रशेखर फडणीस, चंदू घाटगे,  लाड व कामगार उपस्थित होते.