|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पूर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

पूर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य 

कोल्हापूर :

चार दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्याने पूर ओसरला आहे. पंचगंगा नदीचे पुराचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. ज्या परिसरात पूराचे पाणी आले होते. तेथे मात्र, प्लास्टिक कचरा, गाळ व कुजलेला पिकांचा पाला रस्त्यावर आला आहे. यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून महापालिका प्रशासनाने साथीचा आजार पसरू नयेत, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहेत. तातडीने येथे औषध व धुराची फवारणी करणे गरजेचे आहे.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला होता. गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्र व शहरामध्ये पावसाने उसंती घेतली आहे. त्यामुळे पूर ओसरला आहे. पंचगंगा नदीचे पाणी तब्बल पाच दिवसानंतर पुन्हा पात्रात गेले आहे. असे असले तरी पूर आलेल्या ठिकाणी पाण्याबरोबर शहरातील प्लास्टिक पिशव्या, गाळ साचून राहिला आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना येथून ये-जा करताना तोंडाला रुमाल बांधूनच करावी लागत आहे.

महापालिका प्रशासनाने पूर परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असली तरी पूराचे पाणी आलेल्या सर्व ठिकाणी अद्यापही औषध अथवा धुराची फवारणी केलेली नाही. या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत. यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे. अतिरिक्त कर्मचाऱयांची नेमणूक करून येथे उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Related posts: