|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्री क्षेत्र पावसचे स्वामी गोकुलेंद्र सरस्वती समाधीस्त

श्री क्षेत्र पावसचे स्वामी गोकुलेंद्र सरस्वती समाधीस्त 

प्रतिनिधी /कुरूंदवाड :

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री क्षेत्र पावस (जि. रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंदाचे पट्टाशिष्य स्वामी गोकुलेंद्र सरस्वती हे आज समाधीस्त झाले.

ब्रह्मचारी अवस्थेत सन्यासदीक्षा घेतली होती. चार्तुमासानिमित्त ते कोकणात गेले होते. बुधवारी सकाळी साउs अकराच्या सुमारास त्यांना नृसिंहवाडी येथे आणण्यात आले. त्यांची दिगंबराच्या नाम जप व वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी श्रीमद्  गुरूचरित्र ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहून त्यांच्या हजारो प्रति वितरीत केल्या. नृसिंहवाडीकरांसह अन्य भक्तांना भेट म्हणून दिल्या होत्या. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर असे होते.

दरम्यान मिरवणुकीनंतर कृष्णा-पंचगंगा संगमस्थळा जवळ येथील ब्रह्मवृंदानी मंत्रपठण केले व समाधीस्त होत्या अगोदरची पंचोपचार पुजा केली. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य भागातील शिष्यसमुदाय उपस्थित होता. शोकाकूल वातावरणात स्वामींचे दर्शन घेवून सर्वांनी अखेरचा निरोप घेतला.

Related posts: