|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » घोडावत कन्झ्युमरची ‘कॅन्डीस्टार मस्ती’ बाजारात दाखल

घोडावत कन्झ्युमरची ‘कॅन्डीस्टार मस्ती’ बाजारात दाखल 

कोल्हापूर :

घोडावत कंन्झ्युमर प्रॉडक्टस (जीसीपीएल) हा एफएमसीजी विभागांतर्गत (संजय घोडावत ग्रुप) कार्यरत असलेला विभाग आहे. हा विभाग अत्यंत वेगाने बहू वैविध्यपूर्ण समूह म्हणून नावारुपास येत आहे. आज या समूहाच्यावतीने कन्फेक्श्नरी प्रकारात ‘कॅन्डीस्टार’ मस्ती अन्लिमिटेड या नावाने भारतीयांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी येत आहे.

विशेष श्रेणी अंतर्गत ‘कॅन्डीस्टार’ या नावाने वितरणासाठी सज्ज असलेल्या ही कन्फेक्शनरी हार्ड बॉईल कॅन्डीज, टॉफी आणि इकलेयर्स या तीन प्रकारात  उपलब्ध होत आहेत. ब्लास्टर-गुलाबी पेरु, ब्लास्टर -कच्चा आम (मसाला कँडी) कॉफी च्यु, पान च्यु (गोड पानाची चव असणारी टॉफी), कोकोनट, इकलेयर्स व इकलेयर्स कॉफी अशा सात प्रकारात उपलब्ध होणार आहे. या ‘कॅन्डीस्टार’ बाजारात वितरण एसएसजीचे चेअरमन संजय घोडावत व संचालक श्रेणिक घोडावत यांच्या हस्ते झाले.

‘कॅन्डीस्टार’ चे सर्व फ्लेवर बाजारात जार व पाऊचमध्ये उपलब्ध असतील. ‘कॅन्डीस्टार’ प्रत्येक फ्लेवर हे सर्वांना आवडतील. ‘कॅन्डीस्टार’ मस्ती अनलिमिटेड या आपल्या नावाप्रमाणे प्रत्येक फ्लेवर्सद्वारे ग्राहकांना आनंद देतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

श्रेणिक घोडावत म्हणाले, ‘कॅन्डीस्टार’ चे प्रत्येक फ्लेवर्स हे योग्य प्रमाण व दर्जा डोळय़ासमोर ठेऊन तयार केलेले आहेत. नव्यात वितरीत झालेल्या या कन्फेक्शनरी विभागामुळे एसजीजी विस्तारण्यास फायद्याचे ठरेल तसेच नव्याने बाजारात येऊ घातलेल्या आमच्या इतर प्रॉडक्टसाठी यशस्वी पाऊलखुणा ठरतील. नव्याने वितरीत झालेल्या या कन्फेक्शनरी ‘कॅन्डीस्टार’ महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या ठिकाणी असलेल्या किरकोळ व घाऊक वितरकांना वितरित करणार आहोत.

Related posts: