|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘शाहू’ चे विजय औताडे ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानीत

‘शाहू’ चे विजय औताडे ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्काराने सन्मानीत 

प्रतिनिधी /कागल :

ग्लोबल ऍग्रो फाऊंडेशन, संपादक व पत्रकार संघ मुंबई, राष्ट्रीय किसान संघटना व शेतकऱयांचे पंचप्राण शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना यांचे मार्फत सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल ‘उत्कृष्ट कार्यकारी संचालक’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार छत्रपती शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांना न्या. टी. जी. कोल्हे यांच्या शुभ हस्ते व आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळय़ास माजी न्यायमूर्ती जी. डी. इनामदार, न्या. बी. आर. पाटील, न्या. दयालसिंह पवार, शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेतर्फे सन 2004 पासून राज्यातील विविध संस्था, आय. ए. एस. आय. पी. एस. अशा मान्यवर व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. त्याअनुशंगाने सहकार क्षेत्रात कार्यकारी संचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार विजय औताडे यांना देण्यात आला आहे. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या व सहकारातील आदर्श म्हणून ओळख असलेल्या ‘शाहू’ कारखान्यामध्ये औताडे गेली 18  वर्षे कार्यकारी संचालक म्हणून काम करीत आहेत. गेली 36 वर्षे त्यांचा सहकार क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राची जाण आणि अनुभव असणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

मागील महिन्यात अविष्कार सोशल ऍण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापूर यांनी औताडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शाहू कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत 56 पारितोषिके मिळविलेली आहेत. याबद्दल बोलताना औताडे म्हणाले, सहकारातील अभ्यासू व्यक्तीमत्व स्व.राजे विक्रमिसंह घाटगे हे माझ्या आदर्शस्थानी आहेत. त्यांच्या अमुल्य व कुशल नेतृत्वगुणामुळे आपण सहकार क्षेत्रात उत्तम काम करु शकलो. माझे यश व जडण-घडण हे त्यांच्याच मार्गदर्शनाचे फलित आहे. औताडे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे ‘शाहू’ कारखान्याच्या नावलौकिकात आणखीन भर पडली आहे.

Related posts: