|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » दर दिनी व्हॉट्सऍप वापरकर्त्यांची संख्या 1 कोटीवर

दर दिनी व्हॉट्सऍप वापरकर्त्यांची संख्या 1 कोटीवर 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय मॅसेजिंग ऍप व्हाट्सऍपच्या दैनंदिन वापरकर्त्यांची संख्या एक अरबच्या पलीकडे गेली आहे. फक्त एका वर्षाआधी ‘दर महिना’ एक अरब लोक व्हाट्सऍपचा वापर करत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले होते. आता एका वर्षातच ‘दरदिवशी’ जगभरातील एक कोटी लोक व्हाट्सऍपद्वारे मित्र आणि कुटूंबियाशी संपर्कात असतात, हे सांगणे रोमांचकारी अनुभव असल्याचे व्हाट्ऍपकडून सांगण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे भारत ही व्हाट्सऍपची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फेब्रुवरी 2017 मध्ये देशांतर्गत सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 20 कोटी इतकी नोंदवली गेली होती.  एक कोटी दैनंदिन वापरकर्त्यांत भारतीयांच्या प्रमाणाबद्दल मात्र व्हॉट्सऍपकडून माहिती देण्यात आली नाही. महिन्याभरात किमान एकदा तरी व्हॉट्सऍपचा वापर करणाऱयांची संख्या 1.3 कोटी इतकी आहे. जगभरातील लोक प्रतिदिनी 55 अरब संदेश आणि 4.5 अरब फोटो पाठवण्यासाठी आपल्या मंचाचा वापर करतात असा दावा फेसबुकची उपकंपनी व्हाट्सऍपने केला आहे. 60 विविध भाषेत उपलब्ध असणाऱया ऍपद्वारे दर दिवशी एक अरब व्हिडीओंs पाठवण्यात येतात.

 

 

 

 

 

 

Related posts: