|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » टाटाने सादर केली जैव इंधनावर धावणारी बस

टाटाने सादर केली जैव इंधनावर धावणारी बस 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी स्वदेशी कंपनी टाटा मोटर्सने आपली पहिली सीएनजी (जैव मिथेन) इंधनावर संचलित बस आज सादर केली. बायो मिथेनवर धावणाऱया बसचे तीन संस्करण बाजारात उतरवण्यात आले आहेत. यात   टाटा एलपीओ 1693 या प्रमुख मॉडेलचा समावेश आहे. जे  5.7 एसजीआय, बीएस-4 आयओबीडी-2 निकषांची परिपूतर्ता करते.

तेल मंत्रालयाकडून आयोजित ऊर्जा महोत्सवात या बसांच्या तीनही मॉडेल सादर करण्यात आल्या. मात्र अद्याप यांच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नाहीत. स्मार्ट-सिटींना स्वच्छ ठेवण्यास बायो-सीएनजी बसचे प्रमुख योगदान असेल असे टाटा मोटर्सचे व्यावसायीक वाहन विभागाचे बिझनेस हेड गिरीश वाघ म्हणाले. सध्या पुणे महानगरपालिकेकडून या बसचा वापर करण्यात येत आहे.

काय आहे मिथेन गॅस

बायो मिथेनला बायो गॅस देखील म्हणण्यात येते. घरगुती खाद्यपदार्थांच्या कचऱयापासून याची निर्मिती केली जाते. तसेच या वायुच्या ज्वलनाने कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण अथवा वातावरणाची हानी होत नाही. पेट्रोल-डिझेलच्या वापराने वाढत असलेल्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी सरकार आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या ठोस पाऊले उचलत आहेत. यात वीजेवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीचाही प्रामुख्याने समावेश आहे.

 

Related posts: