|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » मारुतीच्या नफ्यात 4.4 टक्क्यांची वाढ

मारुतीच्या नफ्यात 4.4 टक्क्यांची वाढ 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

प्रवासी कार क्षेत्रातील दिग्गज भारतीय कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात 1556 कोटी 40 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गत सालीच्या समान कालावधीत कंपनीला 1490 कोटी 90 लाख रुपयांचा नफा झाला होता. यंदा त्यात 4.4 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. काही प्रलंबित करांसाठी अधिक रक्कमेचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यामुळे निव्वळ नफा कमी दिसून येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. संपलेल्या 2016-17 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 1710 कोटी 50 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. 16.7 टक्क्याच्या वाढीसह मारुती सुझुकीची या तिमाहीतील निव्वळ विक्री 17132 कोटी 40 रुपयावर पोहचली आहे. तर 13.2 टक्क्याच्या वाढीसह कंपनीने एप्रिल ते जून या  तिमाहीत एकूण 3,94,571 वाहनांची विक्री केली आहे. यातील 26,140 वाहनांची निर्यात करण्यात आली. नवी मॉडेल्स सादर केल्यामुळे विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

 

Related posts: