|Thursday, July 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शर्मिला पुत्र झाला

शर्मिला पुत्र झाला 

शर्मिने केलेला बिनतोड युक्तिवाद ऐकल्यावर तिच्या बोलण्यात तथ्य आहे अशी ययातीची खात्री पटली. त्याने तिचे कौतुक केलें, आणि आपला ऋतुकाल विफल होऊ नये यासाठी तिने केलेली प्रार्थना स्वीकारून, त्याने धर्मानुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्याने लगेच गांधर्व पद्धतीने शर्मि÷sशी विवाह केला. शर्मि÷sशी समागम केला, आणि तिची इच्छा त्याने पूर्ण केली. समागमानंतर दोघांनीही एकमेकाचा पुरस्कार केला, आणि ती दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेली. त्या समागमातून लावण्यवती चारुहासिनी शर्मि÷ा गर्भवती झाली. नंतर प्रसूतीचा काळ आल्यावर त्या कमलनयना शर्मि÷sला साक्षात देवकुमाराप्रमाणे दीप्त कांती असलेला कमलनयन पुत्र झाला.

शर्मि÷sला पुत्र झाला हे वृत्त कळताच देवयानी दु:खीकष्टी झाली. शर्मि÷sला कुणापासून पुत्र झाला असावा, हा प्रश्न तिच्या मनात थैमान घालू लागला. द्वेषभावनेमुळे शर्मि÷sचा विचार काही केल्या तिच्या मनातून जाईना. अखेर मनात विचारांचे काहूर झाल्यामुळे ती स्वतः शर्मि÷sकडे गेली आणि शर्मि÷sला तिने विचारले-शर्मि÷s! कामवासनेला बळी पडून कसले घोर पातक केले आहेस तू! हा कुणाचा पुत्र आहे?

त्यावर शर्मि÷sने उत्तर दिले-महाराणी देवयानी, ऐक! वेदाध्ययनात पारंगत असलेला कोणी एक धर्मशील ऋषि माझ्याकडे आला होता. माझी कामेच्छा तृप्त करण्यासाठी मी जी त्या ऋषींची प्रार्थना केली ती धर्माला सर्वस्वी अनुसरूनच होती. आणि त्या ऋषीनेही माझी अभिलाषा पूर्ण केली. चारुहासिनी देवयानी, कामेच्छा अधर्माने पूर्ण करून घ्यावी असा विचार माझ्या मनाला कधीही शिवला नाही. त्या ऋषींपासूनच मला हा पुत्र झाला आहे. मी जे बोलत आहे ते अगदी सत्य आहे.

देवयानी म्हणाली-लज्जावति शर्मि÷s! तू म्हणतेस ते खरे असेल तर फारच उत्तम! पण ज्या ऋषीचा तू उल्लेख केलास तो होता तरी कोण हे तुला माहीत आहे का? त्या ऋषीचे गोत्र कोणते? त्याचे नाव काय? आणि तो कोणत्या कुळातला? सारे सारे मला कळलेच पाहिजे.

देवयानीच्या या प्रश्नांनी मात्र शर्मि÷sची घाबरगुंडी उडाली. पण सर्व धीर एकवटत शर्मि÷ा तिला म्हणाली-खरें सांगू, देवयानी! तपाच्या सामर्थ्यामुळे, आणि तेजस्वीपणामुळे तो ऋषि इतका देदीप्यमान होता की, त्याला पाहिल्याबरोबर अशी कसलीही चौकशी करण्याचा मला धीरच झाला नाही. त्यावर नाईलाजाने देवयानी म्हणाली-शर्मि÷s! तू म्हणतेस तसेच असेल तर उग्र तपश्चर्येमुळे ज्ये÷ असलेल्या, व प्रति÷ित कुळ असलेल्या ब्राह्मणापासून जर तुला अपत्य झाले असेल, तर तुझ्यावर माझा राग नाही! देवयानी व शर्मि÷ा एकमेकीशी असे बोलल्या. शर्मि÷sने जे सांगितले ते सत्यच असावे असे देवयानीला वाटले. त्यामुळे झाला प्रकार तिने हसण्यावारी घालवला आणि ती आपल्या महालात परत गेली. काही काळानंतर देवयानीपासून ययातीला आणखी एक पुत्र झाला. पहिला यदु आणि नंतर तुर्वसु असे हे देवयानीचे दोन पुत्र होत.

Related posts: