|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर

डिझेलच्या दरानुसार आता ‘रो-रो’ माल वाहतूक दर 

उत्पन्न वाढीसाठी कोकण रेल्वेचा निर्णय

विभागीय व्यवस्थापक निकम यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण रेल्वेला ^प्रवासी वाहतुकीपेक्षा रो-रो मालवाहतुकीतून मोठे उत्त्पन्न मिळते. त्यामुळे आता माल वाहतूक सेवेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार रो-रो वाहतुकीचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिझेलच्या बदलत्या दरानुसार वाहतुकीचे दर आकारण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली.

कोकण रेल्वेला 2016-17 या वर्षामध्ये रो-रो मालवाहतूक सेवेतून 38 कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत 9 कोटीच्या उत्पन्नाची आणखीन भर पडली आहे. मात्र, डिझेलच्या दरातील चढ-उताराचा परिणाम या सेवेवर होत असून त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होताना दिसत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने डिझेलच्या दरानुसार या सेवेचा दर लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निकम यांनी सांगितले.

या नव्या निर्णयाची कार्यवाहीही सुरू झाली आहे. रो-रो सेवेचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राज्यस्थान, केरळ या राज्यातील वाहतूकदारांना होत असतो. रो-रोद्वारे प्लायवूड, केमिकल, टाईल्स, स्टिल कॉईल यांच्यासह विविध मालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे व्यापारी कंपन्यांची महामार्गावरून होणाऱया वाहतूक कोंडीतून सुटका होतेच त्याचबरोबर ट्रकच्या इंधनातही बचत होत असल्याने पर्यावरण संवर्धनासही हातभार लागतो. याशिवाय ट्रक चालकाची मेहनतही कमी होत असल्याने रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी सांगितले.

Related posts: