|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पाटो येथे दुचाकी चोरटय़ाला अटक

पाटो येथे दुचाकी चोरटय़ाला अटक 

प्रतिनिधी /पणजी :

पणजी पोलिसांनी गुरुवारी पाटो येथे केलेल्या कारवाईत एका दुचाकी चोरटय़ाला अटक केली आहे. त्याच्या सोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भादंसं 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून, आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव प्रदीप कल्लाप्पा दानाप्पावर असे आहे. मूळ कर्नाटकातील असून, तो सापेर येथे राहत होता. त्याच्या सोबत फिरणारी अल्पवयीन मुलगी ही बाणास्तारची आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी काही दिवसापूर्वी किर्ती था यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलीस याबाबत तपास करीत होते. गुरुवारी संशयित व त्याच्या सोबत असलेली अल्पवयिन मुलगी पाटो येथे जीए-06-डब्लू-9927 क्रमांकाच्या दुचाकीने फिरत होती. त्या दुचाकीची नंबरप्लेट बनावट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी संशयिताल ताब्यात घेऊन दुचाकीच्या नंबरप्लेटची तपासणी केली असता, त्या दुचाकीचा जीए-07-एम-7821 नंबर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली.  त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. राज्यात दुचाकींच्या चोऱया मोठय़ाप्रमाणात झाल्या असल्याने संशयिताचा अणखिन कुठल्या दुचाकी चोरी प्रकरणात आहे की नाही याचा तपास करीत आहे.

Related posts: