|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाळपईत पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु

वाळपईत पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु 

प्रतिनिधी /वाळपई :

वाळपई मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपचे उमेदवार व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या प्रचाराला जोर आणला आहे तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी वाळपईतील काँग्रेसची यंत्रणा सक्रिय झाल्याने एकतर्फी वाटणारी पोटनिवडणूक रंगणार असे चित्र आहे.

विश्वजित राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाल्याने ही निवडणूक होणार आहे. विश्वजित राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर वाळपईतील काँग्रेसचे अस्थित्व संपणार असे म्हटले जात होते मात्र सध्या तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यावर काँग्रेस नेत्यांनी भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणजे वाळपई काँग्रेस युवा समिती अध्यक्षपदी सरफराज खान यांची तर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोशन देसाई यांची निवड जाहीर केली आहे.

काँग्रेसतर्फे सध्या गोवा प्रदेश युवा नेते संदेश नार्वेकर व आमदार रवी नाईक यांच सुपूत्र रॉय नाईक यांच्यात उमेदवारीसाठी चुरस सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही वाळपईतील जनतेच्या गाठीभेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. संदेश नार्वेकर यांचे शिक्षण वाळपईत झाल्याने त्यांना ओळखणारे बरेच मित्र परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून वाळपईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक हेही वाळपईत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. रवी नाईक यांचा या मतदारसंघातील काही भागात चांगले संबंध असल्याचा फायदा रॉय नाईक यांना होऊ शकतो. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून रॉय नाईक वाळपईतील जुन्या काँग्रेस कार्यक्रर्त्यांची भेट घेत आहेत.

Related posts: