|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चिंचवाड चिंबल येथे क्रॉसची मोडतोड

चिंचवाड चिंबल येथे क्रॉसची मोडतोड 

प्रतिनिधी /पणजी :

चिंचवाडा चिंबल येथे एका क्रॉसची मोडतोड केल्याने राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. काही दिवसापूर्वी धार्मिकस्थळांची मोडतो करण्याचे प्रकार दक्षिण गोव्यात होत होते. या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. आता हा प्रकार उत्तर गोव्यात होऊ लागल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. 25 रोजी करंजाळ मडकई येथील ख्रिस्ती दफनभूमीमधील क्रॉसची मोडतोड करण्यात आली होती तर आणखिन दोन दिवसांनी चिंचवाडा चिंबल येथे क्रॉसची मोडतोड करण्यात आली असल्याने खळबळ माजली आहे.

क्रॉस मोडतोड प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी, एसडीपीओ नेल्सन आल्बुकेर, ओल्ड गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आशिश शिरोडकर तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल त्वरीत दाखल झाले होते.

मोडतोड केलेल्या क्रॉसवर घण किंवा हातोडा मारल्याचे दिसून येत नाही. हा क्रॉस मुळापासून पडलेला आहे. बाजूलाच असलेल्या सिमानमुद करणाऱया दगडावर पडल्याने तो मोडला असावा असा अंदाज प्राथमिक तपासा नंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासा दरम्यान क्रॉसची मोडतोड ही जाणूनबूजून केल्याचे दिसत नसले तरी या घटनेचा बारकाईने तपास केला जाईल असे उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी यांनी सांगितले. ठसे तज्ञांना घटनास्थळी बोलावून ठशांचे नमुने घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रॉस मोडण्याचे जे प्रकार घडलेले आहेत ते लक्षात घेऊन या प्रकरणाचाही तसाच केला जाईल असेही अधीक्षक चौधरी म्हणाल्या.