|Friday, March 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोत आजपासून दामोदर भजनी सप्ताहाची पर्वणी

वास्कोत आजपासून दामोदर भजनी सप्ताहाची पर्वणी 

प्रतिनिधी /वास्को :

मुरगावातील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहाला आज शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. दुपारी 12.30 वाजता श्रींच्या चरणी श्रीफळ ठेवून या 24 तासांच्या अखंड भजन सप्ताहाला प्रारंभ होणार असून उद्या शनिवारी दुपारी गोपालकाल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस वास्को शहरात सप्ताहाची फेरी राहणार आहे. सप्ताहानिमित्त शहरात सर्व आवश्यक सेवांची पूर्ण सज्जता ठेवण्यात आली आहे.

वर्षपद्धतीप्रमाणे श्रावण शुद्ध षष्ठी आज शुक्रवारी 28 रोजी दुपारी 12.30 वाजता जोशी कुटुंबियांतर्फे श्री दामोदरचरणी श्रीफळ ठेवून वार्षिक सप्ताह उत्सवाला प्रारंभ होईल. ज्येष्ठ भजनी कलाकार मनोहर शिवलकर मांद्रेकर यांचे पुत्र अशोक मांदेकर यांच्या ‘हरि जय जय राम कृष्ण हरि’च्या गजराने भजनाला सुरुवात होणार आहे. त्यांना यावेळी हार्मोनियमवर अनिल कोंडुरकर तर मृदंगावर राधाकृष्ण शेटय़े व इतर संगीत साथ करतील. स्थानिक भजनी कलाकार तसेच वेगवेगळय़ा समाजातर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या गोवा तसेच गोव्याबाहेरील गायक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱया दिवशी दुपारी 12.30 वा. सप्ताह उत्सवाची सांगता होईपर्यंत स्थानिक भजनी पथकांचे मंदिरात साखळी पद्धतीने 24 तास अखंड भजन होणार आहे.

चोवीस तास चालणार साखळी भजन

सप्ताहदिनी दुपारी दोन वाजल्यापासून श्री दामोदर मंदिरामध्ये अखंड 24 तास साखळी पद्धतीने होणाऱया स्थानिक भजनी पथकांची भजने असतील. त्यात बेलाबाय भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, कलादीप भजनी मंडळ (महिला), त्रिमूर्ती भजनी मंडळ,  लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, त्रिशुल खाप्रेश्वर भजनी मंडळ, मुशेले कला मंडळ, शिवप्रासादिक भजनी मंडळ, साईबाबा भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ, ॐकार संगीत भजनी मंडळ, संतोषी माता भजनी मंडळ, स्वरब्रह्म भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ, शिवसमर्थ भजनी मंडळ, राष्ट्रोळी भजनी मंडळ, ओरूले दत्तवाडी भजनी मंडळ, मधुकर मांजरेकर भजनी मंडळ, राजाराम भजनी मंडळ, ॐ  विष्णू कला संस्कृती संस्थान, शारदा संगीत विद्यालय, गणपती पंचायतन भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ ही पथके भाग घेतील.

सदर भजने राजेंद्र डिचोलकर, प्रभाकर शेट तानावडे, अनिल सातार्डेकर, व्ही. व्ही. शेटय़े, अशोक मांद्रेकर, एम. व्ही. शेटय़े, कामाक्षी ऑफसेट प्रिंटर्स, ऍड. राजन नाईक, उमेश साळगावकर, प्रिंट स्टुडिओ, ऍड. अशोक नाईक, भोसले काफेतारीया, हिरा केतन ठक्कर या सर्वांनी पुरस्कृत केलेली आहेत.

Related posts: