|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुग्धोत्पादनातून 40 हजार जणांना रोजगार

दुग्धोत्पादनातून 40 हजार जणांना रोजगार 

प्रतिनिधी /पणजी :

दुग्धोत्पादन व्यवसायातून आगामी 5 वर्षात 20 ते 40 हजार जणांना रोजगार प्राप्त होईल व राज्यात अडीज लाख लिटर्सनी दूध उत्पादन वाढीस जाण्यासाठी अमुल डेअरीच्या सहकार्याने एक आकर्षक योजना आखली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी रात्री राज्य विधानसभेत केली. तसेच श्वानपालनासाठी पुढे येणाऱया एनजीओंसाठी भरघोस आर्थिक मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली.

राज्य विधानसभेत वीज, समाजकल्याण, नदिपरिवहन, नागरी पुरवठा, रोजगार, मजूर, वस्तुसंग्रहालय, पुरातत्व, पुराभिलेख इत्यादी मागण्यांवरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. या मागण्या राज्य विधानसभेत आवाजी मतांनी संमत करण्यात आल्या.

राज्यात दुग्धोत्पादनाद्वारे रोजगार मोठय़ा प्रमाणात मिळवून दिला जाईल. सुमारे 8 हजार शेतकऱयांना दुग्धोत्पादन योजनेंतर्गत वार्षिक 41.37 कोटींची सबसिडी आम्ही देतो. देशात कुठेच नाही एवढी प्रतिलिटर 10 रुपये याप्रमाणे सबसिडी दुधावर गोवा सरकार देत असल्याचे ते म्हणाले. यामुळे दुग्धोत्पादनात 35 हजार लिटर प्रतिदिनावरून 70 हजार लिटर दुधाची निर्मिती झाली. अद्याप 3 लाख लिटर दूध कमी आहे. पुढील चार पाच वर्षात अडीच लाख लिटर दूध निर्मितीद्वारे 20 हजार कुटुंबे तसेच 20 ते 40 हजार रोजगार तयार होतील. आपण अमुल डेअरीशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts: