|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » हुंडय़ाच्या तक्रारीनंतर लगेच अटक नको : सुप्रिम कोर्ट

हुंडय़ाच्या तक्रारीनंतर लगेच अटक नको : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हुंडय़ासाठी छळ करण्यात येत असल्याची तक्रार विवाहितांनी केल्यानंतर लगेच तिच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना अटक केली जाऊ नये. तक्रारीची शाहनिशा आणि आरोप सिद्ध झाल्यानंतरच गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, असा आदेश सुप्रिम कोर्टाने दिला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यावरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर सुप्रिम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. हुंडय़ासाठी छळ होत असल्याच्या तक्रारींची शाहनिशा करण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्हात कुटुंब कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी. समितीने त्याचा अहवाल दिल्यानंतरच अटक करावी, त्याआधी नको, असे न्यायलयाने आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत.

 

Related posts: