|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » leadingnews » नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हटवले

नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हटवले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पनामा पेपर प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सुप्रिम कोर्टाने शुक्रवारी दिला आहे. पनामा पेपर प्रकरणी नवाझ शरीफ यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लांड्रिंगचा आरोप होता. या प्रकरणी आज पाकिस्तानच्या सुप्रिम कोर्टात सुनावणी होती. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने त्यांना याप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधान पदावरून हटवण्याचा निर्णय पाकिस्तान सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची गादी कोण संभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

Related posts: