|Friday, April 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केरळमध्ये भाजप-सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

केरळमध्ये भाजप-सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री 

वृत्तसंस्था/ तिरुवअनंतपुरम्

भाजप आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारीही जोरदार धुमश्चक्री उडाली. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप राज्य कमिटीच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीपीएमचे राज्य सचिव के. बालकृष्णन यांच्या घरावर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या या हिंसक धुमश्चक्रीचा व्हिडीओही प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

या व्हिडीओमध्ये डीवायएफआयचे राज्य कमिटी सदस्य आय. पी. बीनू आणि एसएफआयचे राज्य सचिव प्राजिन हे तोडफोड करणाऱया कार्यकर्त्यांबरोबर दिसून आले आहेत. या घडामोडींमध्ये भाजपचे केरळ प्रदेश अध्यक्ष कुम्मानम राजशेखर यांच्या सहा गाडय़ांचे नुकसान झाले आहे. राजशेखर यावेळी घरामध्येच होते.

गेल्या काही महिन्यांपासून केरळमध्ये भाजप आणि सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त वाद सुरु असून हिंसक घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वर्षभरात भाजपच्या चार कार्यकर्त्यांची तर सीपीएमच्या एक कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. अजूनही हा वाद शमला नसल्याचेच शुक्रवारच्या घटनेने स्पष्ट झाले आहे.

Related posts: