|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » युरोप दौऱयासाठी संघात चार नवोदितांना संधी

युरोप दौऱयासाठी संघात चार नवोदितांना संधी 

संघात सहा युवा खेळाडूंची वर्णी, मनप्रीत सिंगकडे कर्णधारपद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुलतान अझलन शाह व विश्व हॉकी लीग स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आगामी युरोप दौऱयासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात बेल्जियम व हॉलंडविरुद्ध होणाऱया मालिकेसाठी भारतीय हॉकी संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. संघात सहा युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले असून मनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या कनिष्ठ विश्वचषक विजेत्या संघातील काही खेळाडूंना हॉकी इंडियाने संघात स्थान दिले आहे. भारतीय संघाच्या या दौऱयाला 9 ऑगस्टपासून प्रारंभ होईल.

नियमित कर्णधार पी.आर.श्रीजेश दुखापतग्रस्त असल्याने सहा महिने संघापासून दूर असणार आहे. यातच डिंसेबरमध्ये भारतात विश्व हॉकी लीग स्पर्धा होणार असल्याने या स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त होईल, असे हॉकी इंडियाने यावेळी स्पष्ट केले. बेल्जियममध्ये होणाऱया या मालिकेसाठी संघात कनिष्ठ संघातील सहा युवा खेळाडूंना स्थान देण्यात आल्याचे हॉकी इंडियाने यावेळी स्पष्ट केले. गोलरक्षक सुरज करकेरा, वरुण कुमार, दिपसेन टर्की, निलकांत शर्मा, गुरजंत सिंग व अरमान कुरेशी या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, यंदाच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेत कलिंगा लान्सर्स संघाच्या जेतेपदात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱया डॅगफ्लिकर अमित रोहिदासलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

‘2020 टोकिओ ऑलिम्पिकसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ संघ, हॉकी इंडिया लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया युवा खेळाडूंना संघात स्थान दिले असल्याचे हॉकी इंडियाने यावेळी जाहीर केले. 9 व 10 ऑगस्ट रोजी भारतीय संघ बेल्जियमविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारताचा सामना हॉलंडविरुद्ध होईल.

भारतीय हॉकी संघ :

गोलरक्षक – आकाश चिकटे, सुरज करकेरा.

बचावफळी – दिपसेन टर्की, कोथाजीत सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास, वरुण कुमार.

मध्यफळी – एसके उथप्पा, हरजीत सिंग, मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलसेना सिंग (उप कर्णधार), सुमीत शर्मा.

आघाडीफळी – मनदीप सिंग, रमणदीप सिंग, ललित कुमार, गुरजंत सिंग, अरमान कुरेशी.

Related posts: