|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केवळ 911 ग्राम पंचायतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

केवळ 911 ग्राम पंचायतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे 

प्रतिनिधी/ बेळगाव

सर्व ग्राम पंचायतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश सरकारतर्फे देऊन वर्ष उलटले आहे. राज्यात एकूण 6021 ग्राम पंचायत कार्यालये आहेत. त्यापैकी केवळ 911 ग्राम पंचायतींनीच या आदेशाचे पालन केले आहे.

ग्राम पंचायतींचा कारभार चोख व्हावा, या उद्देशाने सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला होता. सरकारच्या मार्गसूचीनुसार सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याकरिता 50 हजार रुपये खर्च येत आहे. त्याच बरोबर विद्युत बॅकअपदेखील हवा. त्यामुळे 80 हजार रुपयांपर्यंत खर्च आहे. सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी करण्यासाठी अनुदान द्यायला हवे, अशी मागणी पीडीओ, ग्रा. पं. अध्यक्षांनी केली आहे. मात्र, अनुदान नसल्यामुळेच बऱयाच ग्राम पंचायतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याची कारणे देण्यात येत आहेत.

काय आहे आदेश?

दि. 26 जून 2016 रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार सर्व व्यवहार पारदर्शक होण्यासाठी सर्व ग्राम पंचायतींमध्ये त्यांना मिळणाऱया अनुदानामध्येच सीसी कॅमेरे बसवावेत. सदर कॅमेरे हे चांगल्या दर्जाचे असावेत. त्याच बरोबर विद्युत बॅकअप देखील असावे व यामधून गुणात्मक व्हिडिओ चित्रीकरण व्हायला हवे व सदर सीसीटीव्ही कॅमेऱयातील दृश्य प्रत्येक महिन्याचे सेव्ह करून ठेवले पाहिजे, असा आदेश अधिकारीवर्गाने दिला आहे.

कोठे बसवावेत कॅमेरे?

ग्राम पंचायत मुख्य गेट, सभांगण, व्यवहार करण्याचे ठिकाण, सार्वजनिकांना सेवा देण्यात येणारे ठिकाण, सर्व दस्तावेज ठेवलेल्या कोठडय़ा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे.

Related posts: