|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » झाडशहापूर येथे ट्रकला अपघात

झाडशहापूर येथे ट्रकला अपघात 

वार्ताहर/ मजगाव

खानापूर रोड, झाडशहापूरनजीकच्या पेट्रोल पंपाजवळ मालवाहू ट्रकला पाठीमागून येणाऱया ट्रकने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडली. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली.

झाडशहापूरजवळील पेट्रोलपंपाकडे जाण्यासाठी एक दुचाकीस्वार अचानक वळल्याने पाठीमागून येणाऱया ट्रक चालकाने बेक लावला. तोच पाठीमागून वाळू भरून येणाऱया ट्रकने (क्र. केए 22 ए 5492) समोरील वीट वाहतूक करणाऱया ट्रकला (केए 22, 5816) जोराची धडक दिली. त्यामुळे वाळू भरलेल्या ट्रकच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. सुदैवानेच ट्रकचालक बचावला. सदर ट्रकमध्ये चार प्रवासीही होते.

ट्रकची धडक पाहता नशिबानेच चालक बचावल्याचे दिसत होते. या ठिकाणी महिन्याभरात चार अपघात घडल्याने हे ठिकाण धोकादायक बनले आहे. येथे गतिरोधक घालावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Related posts: