|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » leadingnews » अमित शहा संरक्षण मंत्रीपदी?

अमित शहा संरक्षण मंत्रीपदी? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजप अध्यक्ष अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता आहे. अमित शाह हे गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक लढवण्याचे कारण हेच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत. याशिवाय नुकतेच बिहारमध्ये एनडीएच्या साथीला आलेले नितीश कुमार, यांच्या जेडीयूलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपदाचा भार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडावे लागले. पर्रिकरांना संरक्षण मंत्री करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडावं लागले होते. मात्र विधानसभेच्या निकालाने गोव्याच्या राजकारणाचे चित्र बदलेले त्यामुळे पर्रिकरांना पुन्हा संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतावे लागले.

 

Related posts: