|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण किनारा 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज

कोकण किनारा 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज 

बोटींवरील प्लास्टीक दूर करण्याचे काम वेगात

 

वार्ताहर /हर्णै

कोकण किनारपट्टीवर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात होणार आहे. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात मच्छीमार आपापल्या बोटी समुद्रात नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक बोटींवर शाकारलेले प्लास्टीक आता दूर करण्यात आले आहे. मात्र सध्या बोटींसाठी आवश्यक डिझेल पुरवठय़ाच्या चिंतेत मच्छीमार दिसत आहेत.

हर्णै बंदरात जवळपास 800 बोटींची ये-जा होत असते. या सर्व बोटी मासेमारी बंदीच्या काळात आंजर्ले खाडी, दाभोळ खाडी, आडे खाडी यासह हर्णै बंदरात शाकारण्यात येतात. नवीन नियमाप्रमाणे 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरूवात होणार असल्याने ठिकठिकाणी आपापल्या बोटी सज्ज करण्याचे काम मच्छीमारांनी सुरु केले आहे.

नवीन नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलै हा पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावधी ठरवण्यात आला आहे. या कालावधीत मासळीच्या प्रजोत्पादनाचा कालावधी असल्याने बंदीचा हा नवा नियम दोन वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. मुळात नारळी पोर्णिमेनंतरच खऱयाअर्थाने मासेमारी सुरु होते. तोपर्यंत सुरूवातीच्या काळात मिळणारा मासळी साठा पकडण्यासाठी मच्छीमार 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात करतात. त्यामुळे दोन महिने सुनसान असणाऱया हर्णै बंदरात आता मच्छीमारांची वर्दळ वाढत चालली आहे. बोटींवरील खलाशी, किनाऱयालगतच्या मत्स्य व्यावसायिकांच्या सेंटरवरील कर्मचारी आता हर्णै बंदरात दाखल झाले आहेत. मत्स्य व्यवसायिकांनी आपापल्या सेंटरची साफसफाई सुरु केली आहे.

Related posts: