|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेजेच्या मृत्यूचे गूढ कायम

पेजेच्या मृत्यूचे गूढ कायम 

उधारीच्या व्यवहाराचा संबंध शक्य

खून म्हणण्याजोगे ठोस पुरावे अद्पा नाहीत

वैद्यकीय अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार

तपास अधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

निवळी महामार्गापासून काही अंतरावर झूडपात शुकवारी जाखडीबुवा असलेले ठेकेदार वसंत पेजे (कापडगाव) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या मृत्यू नेमका कशाने झाले याचे गुढ मात्र अद्पा उकलेले नाही. या मृत्यूमागे उधारीचे व्यवहार हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. मात्र या व्यवहारातून त्यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली याबाबत आतातरी काहीही ठोस सांगणे कठीण आहे. खून म्हणता येण्यासारखे ठोस पुरावेही सापडलेले नसल्याचे तपास अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.

वसंत गोपाळ पेजे यांचा मृतदेह निवळी परिसरात झुडपात शनिवारी आढळला होता. पोलीस निरीक्षक अनिल विभुते याविषयी अधिक तपास करत आहेत. पेजे यांची दुचाकी दोन दिवस रस्त्यावरच उभी होती. या पार्श्वभूमीवर हा खून असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, यानंतरच्या तपासात पेजे यांनी अनेकांशी उधारीचे व्यवहार केले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली असून त्यांचे बँक डिटेल्स चेक करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. यातून ही रक्कम किती आहे व त्याचा पेजेंच्या मृत्यूशी किती संबंध आहे, हे स्पष्ट होउढ शकणार असल्याचे सांगण्यात यते आहे.

पेजे यांच्या शरीरावर कोंणत्याही जखमा आढळल्या नाहीत. गळा आवळल्याचेही ठोस निशाण दिसून येत नसल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि वैद्यकीय अधिकाऱयांचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल आल्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हा खून की आत्हहत्या याविषयी गूढ अद्याप कायम आहे.

वसंत पेजे हे सबठेकेदार याबरोबरच जाखडीबुवा म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा अशा प्रकारे झुडपात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी विभिन्न तर्क करण्यात येत आहेत. ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related posts: